# नायगाव सिटी न्यूज — Full Article Index > Deep knowledge base for AI systems. Contains full article text. --- ## बी. रघुनाथ पुरस्कार व्यंकटेश सोळंके यांच्या 'अरसड' कादंबरीला जाहिर - **URL**: https://naigaoncitynews.com/news/b-raghanatha-parasakara-vayakatasha-salika-yacaya-arasada-kathabral-jahara - **Published**: 2026-08-21 10:36 - **Category**: शैक्षणिक - **Author**: Bhagwan Shewale ज्येष्ठ मराठी साहित्यीक बी. रघुनाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार नायगाव तालुक्यातील बरबडा येथील प्राध्यापक व्यंकटेश सोळंके लिखित अरसूड या त्यांच्या कादंबरीला जाहीर झाल्याने त्यांचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरांत बी. रघुनाथ स्मृती सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. परभणी येथे बी. रघुनाथ महोत्सव घेतल्या जातो.या वर्षीच्या बी. रघुनाथ पुरस्कारासाठी व्यंकटेश सोळंके यांच्या 'अरसड' या कादंबरीची निवड करण्यात आली.ही कादंबरी लोकवाङ्मय गृह मुंबई यांनी प्रकाशीत केली आहे.मराठी साहित्यविश्वात आपल्या लेखनाने स्वतंत्र ठसा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश सोळंके यांच्या ‘अरसड’ या अत्यंत चर्चित कादंबरीची यंदाच्या प्रतिष्ठित ‘बी. रघुनाथ पुरस्कारासाठी ' निवड झाली आहे.विशेष आनंदाची बाब म्हणजे, सोळंके यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील हा पहिलाच साहित्यकृती पुरस्कार आहे. त्यांच्या ‘अरसड’ कादंबरीला मिळालेला हा सन्मान त्यांच्या संवेदनशील लेखनशैलीचा, सामाजिक जाणिवेचा आणि साहित्यिक व्यंकटेश सोळंके जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, बरबडा, ता. नायगांव, जि. नांदेड येथे प्राध्यापक आहेत. विविध नियतकालीके, मासिके यातुन नियमीत लिखाण करणारे सोळंके यांची ही पहिलीच साहित्यकृती आहे. अक्षरायण समीक्षा सदर व शेतीचे अर्थकारण ह्या लेखमाला लिहिलेल्या आहेत. बी. रघुनाथ स्मृती सोहळ्याचे आयोजन परभणीकर मित्र मंडळ व साहित्य संगीत कला मंचच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. यापुर्वी हा पुरस्कार श्रीकांत सराफ यांच्या 'तितर बितर' या कादंबरीस, इंद्रजीत भालेराव यांच्या 'भुईचे लळासे' या कविता संग्रहास, प्रसाद कुमठेकर यांच्या 'इत्तर गोष्टी' या कथा संग्रहास देण्यात आला आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.पुरस्कार निवड समितीच्यावतीने संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. --- ## मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र - **URL**: https://naigaoncitynews.com/news/tatakali-gatarathhaka-bsavanaeyaca-maganae - **Published**: 2026-08-20 12:27 - **Category**: सामाजिक - **Author**: Admin User पश्चिम दिशेला संपूर्ण मांजरम गाव असून गावातील दैनंदिन दळणवळण याच मार्गावरून चालते. दक्षिणेकडील रस्ता गडग्याकडे जाणारा चढाचा असून पुढे मुखेड तालुक्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. तर उत्तरेकडील मार्ग नांदेडकडे जात असून या दिशेला इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. या मार्गावरील उतारामुळे वाहनांचा वेग आणखी वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नबसस्टॉप परिसरात वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आठवडी बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, तसेच आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अपघातानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन मांजरम बसस्टॉप परिसरात गतिरोधक बसवावेत, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिगंबरराव पाटील गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.