नायगाव सिटी न्यूज
search

तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक ; तरीही शाळेला कुलूपच..! शिक्षकांच्या मनमानीला वरिष्ठाचे ‘अभय’..? बरबडा वाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक ; तरीही शाळेला कुलूपच..!  शिक्षकांच्या मनमानीला वरिष्ठाचे ‘अभय’..? बरबडा वाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
“

नायगाव / प्रतिनिधी : भगवान शेवाळे

ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण शिक्षक हा केवळ शिकवणारा घटक नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक जडणघडणीचा प्रमुख आधार असतो. त्यामुळे शिक्षकांची नियमित उपस्थिती, वेळेवर अध्यापन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली शैक्षणिक बांधिलकी ही ग्रामीण शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी अत्यावश्यक आहे. मात्र, शासनाच्या या प्रयत्नांना शिक्षकांच्याच निष्काळजीपणामुळे किंवा अनियमिततेमुळे बाधा येत असेल, तर हे सर्व व्यर्थ असून अशावेळी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण होते.


असाच काहीसा प्रकार बरबडा येथून जवळच असलेल्या वाडी (तब ) या शाळेत घडला आहे.शाळेत अवघे तीन विद्यार्थी असताना याठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत.मात्र विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण मिळते का..? शिक्षक वेळेवर शाळेत उपस्थित राहतात का..? याकडे संबंधित शिक्षण विभागाचे कितपत लक्ष आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,वाडी येथील जिल्हा परिषद शाळा बुधवारी (ता.9) कुलूपबंद असल्याची माहिती मिळाली आहे.बुधवारी या शाळेतील दोन्ही शिक्षक शाळेत उपस्थित नसल्याच निदर्शनास आले.त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक उपलब्ध असतानाही जर शाळेतील अध्यापनच विस्कळीत होत असेल, तर शासनाकडून ग्रामीण शिक्षणासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाचा आणि खर्चाचा नेमका उपयोग कोणासाठी, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.जर या दोन्ही शिक्षकांनी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा प्रशासकीय आदेश नसताना शाळेत अनुपस्थिती दर्शवली असेल, तर त्यांची अधिकृत चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.आणि जर अधिकृत परवानगी घेतली असेल तर मग त्याठिकाणी इतर शिक्षक अध्यापनासाठी का पाठवण्यात आला नाही याचीही सखोल चौकशी वरिष्ठ पातळीवरून होईल का हे पाहणं महत्वाचं आहे.


‘स्कुल ठीक करो‘अभियान सुरू असतानाच शाळेतील अनागोंदी कारभार चव्हाटयावर ..!


एकीकडे ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांची अवस्था, अपुऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.याच पार्श्वभूमीवर CJP कडून ‘स्कुल ठीक करो ’ अभियानाच्या माध्यमातून सरकारी शाळा, त्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी जनजागृती केली जात असताना वाडी येथील शाळेत शिक्षकांच्या अनुपस्थितीचाच प्रकार समोर येणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे.सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे आणि उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य पद्धतीने उपयोग झाला पाहिजे, यासाठी एकीकडे समाजातून आवाज उठत असताना प्रत्यक्ष शाळेतच शिक्षक नियमित उपस्थित राहत नसतील, तर ‘शाळा वाचवा’ अभियान असो की,‘स्कुल कुल ठीक करो अभियान’असे कितीही अभियान चालवले तरी याचा फारसा उपयोग होणार नाही.


अशा प्रकारच्या घटना घडत असताना गावकऱ्यांनी केवळ शिक्षकांशी जवळीक ठेवून त्यांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करण्यापेक्षा गावातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. शिक्षक हा समाज घडविणारा महत्त्वाचा घटक असला, तरी त्यांच्याकडून कर्तव्यात कसूर आणि त्यांची मनमानी चालत असेल तर तर अशावेळी जाब विचारणे देखील गावकऱ्यांचीच जबाबदारी आहे.दरम्यान यासंदर्भात नायगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला असता गुरुवारी झालेल्या प्रकारांबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागरीकांनी आपली नावे पडताळून घ्यावे - बालाजी बच्चेवार
सामाजिक

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागरीकांनी आपली नावे पडताळून घ्यावे - बालाजी बच्चेवार

मुगाव तांडा येथील तत्कालीन मुख्याध्यापकावर निलंबनाची कार्यवाही..कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश...
शैक्षणिक

मुगाव तांडा येथील तत्कालीन मुख्याध्यापकावर निलंबनाची कार्यवाही..कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश...

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

दुष्काळ जाहीर झाला,मग पंचनाम्याचा फेरा कशाला..?
कृषी

दुष्काळ जाहीर झाला,मग पंचनाम्याचा फेरा कशाला..?

ANCHOR AD SLOT