नायगाव सिटी न्यूज
search

मुगाव तांडा येथील तत्कालीन मुख्याध्यापकावर निलंबनाची कार्यवाही..कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश...

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मुगाव तांडा येथील तत्कालीन मुख्याध्यापकावर निलंबनाची कार्यवाही..कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश...

नायगाव /प्रतिनिधी :

शिक्षकाने आपल्या शासकीय कर्तव्याबाबत सदैव जागरूक राहून शालेय कामकाजाचे नियम पाळत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे अपेक्षित असताना मात्र जेंव्हा याच कर्तव्यपालनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात तेंव्हा याचा थेट परिणाम शाळेच्या शैक्षणिक वातावरणावर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होऊ शकतो.शिक्षकांच कर्तव्य आणि जबाबदारीच्या भूमिकेवर गांभीर्याने विचार करायला लावणारी शैक्षणिक क्षेत्रातील धडाकेबाज कार्यवाही नायगाव तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

नायगाव तालुक्यातील मुगाव तांडा केंद्र गडगा येथील तत्कालीन मुख्याध्यापक मनोहर भुजंगराव गायकवाड यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोमवारी (दि.28) दिले आहेत.न्यायालयीन कामकाजासाठी जाऊन सुद्धा शाळेतील उपास्थिती पटावर स्वाक्षरी करणे,न्यायालयीन कामासाठी घेतलेल्या रजा सक्षम अधिकाऱ्याकडून मंजूर करुन न घेताच उपभोगणे,नियमबाह्य रजा किंवा उपस्थिती पटावर चुकीची उपस्थिती नोंद करणे,नियमबाह्य प्रसंगिक रजा उपभोगणे,न्यायालयीन प्रकरणात शिक्षा होऊनही प्रशासनास अवगत न करणे असा अहवाल प्राप्त झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ मधील नियम ३ अन्वये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.

दरम्यान,निलंबनाच्या कालावधीत गायकवाड यांचे मुख्यालय गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती देगलूर येथे निश्चित करण्यात आले असून, सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबन काळात नियमानुसार निर्वाहभत्ता देय राहणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागरीकांनी आपली नावे पडताळून घ्यावे - बालाजी बच्चेवार
सामाजिक

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागरीकांनी आपली नावे पडताळून घ्यावे - बालाजी बच्चेवार

तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक ; तरीही शाळेला कुलूपच..!  शिक्षकांच्या मनमानीला वरिष्ठाचे ‘अभय’..? बरबडा वाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
शैक्षणिक

तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक ; तरीही शाळेला कुलूपच..! शिक्षकांच्या मनमानीला वरिष्ठाचे ‘अभय’..? बरबडा वाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

दुष्काळ जाहीर झाला,मग पंचनाम्याचा फेरा कशाला..?
कृषी

दुष्काळ जाहीर झाला,मग पंचनाम्याचा फेरा कशाला..?

ANCHOR AD SLOT