महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने शिक्षकदिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नांदेड येथे आयोजित केला असून जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक गणेश प्रभूआप्पा बडूरे व सहशिक्षक संतोष पद्माकर पचलिंग यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना हा पुरस्कार दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून महापौर सौ. कविताताई मुळे, राहणार असून खासदार रवींद्र पाटील चव्हाण, खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, गिरीशभाऊ जाधव, डॉ. राजेश कल्याणकर, व्यंकटराव जाधव, प्रा. गोपीनाथ सगर, व्यंकटराव वडजे, विठ्ठल सोळंके, नागनाथ स्वामी, प्रकाश पावडे, उमाकांत पवार, सौ.लताताई शिंदे, मारुती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.बरबडा येथील दोन्ही शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने जवाहरलाल नेहरू शिक्षण समितीचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी व सचिव तथा मुख्याध्यापक सुदर्शनराव धर्माधिकारी, सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी मंडळी यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.