नायगाव सिटी न्यूज
search

स्व.वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतिनिमित्त नायगावात 26 ऑगस्ट रोजी भव्य कीर्तन सोहळा

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

स्व.वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतिनिमित्त नायगावात 26 ऑगस्ट रोजी भव्य कीर्तन सोहळा
“

खा. रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक संपन्न कीर्तन सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी कृषी महाविद्यालय येथील वसंत स्मृती स्थळी शनिवारी दुपारी 1 वा खा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जिल्हाभरातून येणारे भाविक, नागरिक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षात घेऊन आसन व्यवस्था, पार्किंग, स्वागत, भोजन व इतर नियोजनासाठी विविध समित्या गठित करून जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

नायगाव / भगवान शेवाळे

लोकनेते तथा माजी खासदार कै. वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त नायगाव (बा.) येथे भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता समाधी पूजन त्या नंतर १० ते १२ या वेळेत वसंत स्मृती कृषी महाविद्यालयाच्या लालवंडी रोड नायगाव बा. परिसरात हा सोहळा होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार युवाकीर्तीवीर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे हरिनामाचे कीर्तन यावेळी होणार असून, त्यांच्या ओघवत्या वाणीतून अध्यात्मासोबतच सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे. कीर्तनाच्या माध्यमातून लोकनेते कै. वसंतराव चव्हाण यांच्या सेवाभावी कार्याला व जनसेवेला अभिवादन करण्यात येणार आहे.

कै. वसंतराव चव्हाण यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. साधेपणा, माणुसकी, जनसामान्यांशी असलेली आपुलकी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कार्यपद्धती यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पंचक्रोशीतील गायक, वादक, भजनी मंडळे तसेच जिल्हाभरातून येणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन खा. रविंद्र वसंतराव चव्हाण,व चव्हाण परिवार तसेच समस्त गावकरी मंडळी, नायगाव (बा.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.



दरम्यान या बैठकीस केशव पाटील चव्हाण, माधव आप्पा बेळगे, वसंत सावकार मेडेवार,प्राचार्य रमेश लव्हेकर ,सुरेश पा. कल्याण, हणमंत पा. चव्हाण, आनंदराव पा. चव्हाण, श्रीनिवास पा. चव्हाण, सुधाकर पा. शिंदे यांच्यासह मान्यवर व्यापारी, पत्रकार, नगरसेवक, तसेच वसंत चव्हाण मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

भक्ती, हरिनाम, प्रबोधन आणि महाप्रसादाचा हा सोहळा कै. वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेणारा प्रेरणादायी उपक्रम असून या विषयावर एक चित्रफित यावेळी दाखवण्यात येणार आहे.अशी माहिती संचलन करते बालाजी शिंदे यांनी दिली.आभार मित्र मंडळाचे सचिव संजय आपा बेळगे यांनी मानले.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागरीकांनी आपली नावे पडताळून घ्यावे - बालाजी बच्चेवार
सामाजिक

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागरीकांनी आपली नावे पडताळून घ्यावे - बालाजी बच्चेवार

मुगाव तांडा येथील तत्कालीन मुख्याध्यापकावर निलंबनाची कार्यवाही..कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश...
शैक्षणिक

मुगाव तांडा येथील तत्कालीन मुख्याध्यापकावर निलंबनाची कार्यवाही..कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश...

तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक ; तरीही शाळेला कुलूपच..!  शिक्षकांच्या मनमानीला वरिष्ठाचे ‘अभय’..? बरबडा वाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
शैक्षणिक

तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक ; तरीही शाळेला कुलूपच..! शिक्षकांच्या मनमानीला वरिष्ठाचे ‘अभय’..? बरबडा वाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

ANCHOR AD SLOT