नायगाव सिटी न्यूज
search

कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस कुंटूरकर शुगरलाच द्यावा - बालाजी बच्चेवार यांचे आवाहन; महायुतीचे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस कुंटूरकर शुगरलाच द्यावा - बालाजी बच्चेवार यांचे आवाहन; महायुतीचे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

नायगाव / प्रतिनिधी

कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रा. लि. च्या १२ व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बालाजी बच्चेवार यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले.

ते म्हणाले, "आपला ऊस आपल्याच हक्काच्या कारखान्याला द्या. बाहेरच्या राज्यातील कारखानदार सध्या ३००० रुपयांपेक्षा जास्त भावाचे आमिष दाखवत आहेत, पण त्यांचा हंगाम संपला की मालक सुद्धा सापडणार नाही. आपला कुंटूरकर कारखाना मात्र १२ महिने आपल्यासोबत आहे.यावेळी त्यांनी चेअरमन राजेश देशमुख कुंटूरकर यांचे अभिनंदन करताना सांगितले की, दुष्काळाची गंभीर परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून वेळेवर कारखाना सुरू करणे, हे फक्त राजेशभैय्या सारखा शेतकरी पुत्रच करू शकतो.

*५० वर्षांचे व्हिजन*

कै. गंगाधररावजी कुंटूरकर यांनी ५० वर्ष पुढील व्हिजन ठेवून या माळरानावर कारखाना सुरू केला, त्याचीच गोड फळे आज आपल्या भागातील शेतकऱ्यांना चाखायला मिळत आहेत. कुंटूरकर साहेबांचा वारसा समर्थपणे राजेश कुंटूरकर चालवित आहेत, याचा मनस्वी आनंद होत असल्याचेही बालाजी बच्चेवार यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.

*महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी*

बच्चेवार पुढे म्हणाले, राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी महाराष्ट्राला १२०० कोटींचे अनुदान मिळाले होते, त्यापैकी एकट्या नांदेड जिल्ह्याला ८०० कोटी रुपये मिळाले आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे.चेअरमन राजेश देशमुख यांनी यंदा ५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपला ऊस कुंटूरकरलाच घालावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.याप्रसंगी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, वसंत पाटील सुगावे, मनोज पाटील मोरे, संचालक रुपेश देशमुख, जी.एम. टी.एस. भालेराव आदींसह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागरीकांनी आपली नावे पडताळून घ्यावे - बालाजी बच्चेवार
सामाजिक

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागरीकांनी आपली नावे पडताळून घ्यावे - बालाजी बच्चेवार

तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक ; तरीही शाळेला कुलूपच..!  शिक्षकांच्या मनमानीला वरिष्ठाचे ‘अभय’..? बरबडा वाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
शैक्षणिक

तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक ; तरीही शाळेला कुलूपच..! शिक्षकांच्या मनमानीला वरिष्ठाचे ‘अभय’..? बरबडा वाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

मुगाव तांडा येथील तत्कालीन मुख्याध्यापकावर निलंबनाची कार्यवाही..कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश...
शैक्षणिक

मुगाव तांडा येथील तत्कालीन मुख्याध्यापकावर निलंबनाची कार्यवाही..कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश...

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

ANCHOR AD SLOT