नायगाव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तथा भारतीय जनता पक्षाच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस सौ. पुनमताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजेश पवार यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते धनंजय पाटील जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुस्लिम समाजातील कॅन्सरग्रस्त रुग्ण शेख हुसेन शेख रजाकसाब यांना उपचारासाठी २१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर वर्ग मोठ्या अडचणीत सापडला असून अश्या परिस्थितीत माझ्या वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजवंतांना मदत करण्याचे आवाहन सौ. पुनमताई यांनी कार्यकर्त्यांना केले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देत धनंजय पाटील जाधव यानी मांजरम येथील मुस्लिम समाजातील कॅन्सरग्रस्त रुग्ण शेख हुसेन शेख रजाकसाब यांना उपचारासाठी २१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.