नायगाव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी दणदणीत विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर नायगाव तालुक्यातील मांजरम येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील मुख्य चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार साहेब, राहुल गांधी आणि डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नावाने विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी व्यंकट शिंदे, शहादत गायकवाड, सुरेश शिंदे, विलास शिंदे, गजानन शिंदे, कैलास जांभळे,रावसाहेब वाघमारे, ओम गायकवाड, रामा बोईनवाड यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व गावातील शेतकरी आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.