नायगाव सिटी न्यूज
search

विकासाच्या नावाखाली निसर्गाची हत्या; वृक्षतोडीचा निर्णय थांबवा – पांडुरंग शिंदे

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

विकासाच्या नावाखाली निसर्गाची हत्या; वृक्षतोडीचा निर्णय थांबवा – पांडुरंग शिंदे

नायगाव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे


विकासाच्या नावाखाली वनसंपदेचा बळी देण्याची सरकारची मानसिकता थांबली पाहिजे. भीमाशंकर परिसरातील सैदोंगर येथे प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी २३३ हेक्टरपेक्षा अधिक वनक्षेत्र आणि ३२ हजारांहून अधिक झाडे बाधित होण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी सरकारवर टीका केली आहे.

भारतीय वन सर्वेक्षणाच्या २०२३ च्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील वनाच्छादन राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या केवळ १६.५३ टक्के आहे. दुसरीकडे, IPCC च्या अहवालानुसार जागतिक तापमानवाढीचे संकट गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत उरलेली नैसर्गिक वनसंपदा नष्ट करणे पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचे शिंदे यांनी म्हटले.नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीचा संदर्भ देत त्यांनी विकासकामांसाठी पर्यावरणाचा बळी देण्याच्या धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. उद्योग उभारणीसाठी पर्यावरणीय संवेदनशीलता कमी असलेल्या पर्यायी जागांचा शास्त्रीय अभ्यास करावा आणि वनसंपदेचे नुकसान टाळावे, अशी मागणी त्यांनी केली.

“विकास हवा; पण निसर्गाच्या विनाशाच्या किंमतीवर नको. सरकारने वृक्षतोडीचा निर्णय तातडीने थांबवून पर्यावरणाचे संरक्षण करावे. अन्यथा भावी पिढ्यांना त्याची गंभीर किंमत मोजावी लागेल,” असा इशारा पांडुरंग शिंदे यांनी दिला.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

नांदेड जिल्ह्यात ‘एमकेसीएल ऑलिम्पियाड मूव्हमेंट’ परीक्षा; ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी..!
शैक्षणिक

नांदेड जिल्ह्यात ‘एमकेसीएल ऑलिम्पियाड मूव्हमेंट’ परीक्षा; ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी..!

सोयाबीन खरेदीतील अवैध कट्टी विरोधात प्रशासनाचे कडक निर्देश
कृषी

सोयाबीन खरेदीतील अवैध कट्टी विरोधात प्रशासनाचे कडक निर्देश

सोयाबीन खरेदीतील २ किलो कट्टीची लूट थांबवा; बालाजी बच्चेवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कृषी

सोयाबीन खरेदीतील २ किलो कट्टीची लूट थांबवा; बालाजी बच्चेवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक ; तरीही शाळेला कुलूपच..!  शिक्षकांच्या मनमानीला वरिष्ठाचे ‘अभय’..? बरबडा वाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
शैक्षणिक

तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक ; तरीही शाळेला कुलूपच..! शिक्षकांच्या मनमानीला वरिष्ठाचे ‘अभय’..? बरबडा वाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

ANCHOR AD SLOT